Exploring the factor driving the recent price rally of gold.
सराफा बाजारात रेकॉर्ड-ब्रेक तेजीचे सत्र सुरूच आहे. सोने आणि चांदीच्या भावात १ हजार रुपयांहून अधिक वाढ दिसून येत असून आज (२१ मार्च) दोन्ही मौल्यवान धातूचे दर प्रचंड वाढले आहेत.
अमेरिकेतून आलेल्या एका बातमीमुळे सोन्याची किंमत नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने २०२४ च्या अखेरीस तीनदा व्याज दरात कपात करण्याचे आपले मत कायम ठेवले. परिणामी, केवळ MCX वरच नव्हे तर कॉमेक्सवरही सोन्याचे दर नवीन विक्रमी उच्चांकावर उसळले आहेत.
सोन्याचा नवा ऐतिहासिक उच्चांक
इंट्राडे दरम्यान उच्चांकावर उंच भरारी घेत MCX वर सोन्याच्या दराने आज देशांतर्गत बाजारात नवा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX_ वर सोन्याचा भाव सुमारे १,००० रुपयांची उडी घेतून नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. देशांतर्गत बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ६६,७०१ रुपयांवर उसळला असून सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये किंमत ६६,७७८ रुपयांपर्यंत पोहोचली आहे, जो आजपर्यंतचा सर्वात उच्चांकी दर आहे. दुसरीकडे, सोण्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ झाली आणि १,१३० रुपयांची उडी घेऊन ७६,४४५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीची किंमत ७८,३२३ रुपयांवर पोहोचली होती तर चांदीची आतापर्यंतचा उच्चांक ७९,५६६ रुपये प्रति किलो आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याला सुवर्ण झळाळी
यूएस फेड रिझर्व्हच्या निर्णयाचा भारतीय बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारावरही परिणाम दिसून आला. कॉमेक्सवर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून कॉमेक्सवर सोने प्रति औंस २,२०० डॉलरवर व्यापार करत होते, जे सुरुवातीच्या व्यापारात २,२२४ डॉलर या नव्या ऑल-टाइम उच्चांकावर पोहोचले होते. दुसरीकडे, चांदीनेही कॉमेक्सवर ३ टक्क्यांनी मजबूत होऊन विक्रमी उच्चांक गाठला.






Pure Nature by Shivani exemplifies a modern approach to beauty—one that prioritizes purity, sustainability, and effectiveness. Through her unwavering commitment to quality,

The director of Devidas Group of Companies is