डोनाल्ड ट्रम्पचा नवा निर्णय भारतीय पोलाद उद्योगाला धक्का देणार? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, भारतीय उद्योगांसाठी आव्हान निर्माण होण्याची शक्यता!

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्पचा नवा इशारा: भारतीय पोलाद उद्योग संकटात?
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या पोलादावर शुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यूएस स्टीलसाठी जपानच्या निप्पॉन स्टीलच्या अधिग्रहणावरही त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे भारतीय पोलाद निर्यातीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आयातीत वाढ व निर्यातीत घट यामुळे भारतीय पोलाद उद्योग आधीच अडचणीत आहे. केंद्र सरकारने या आव्हानांवर चर्चा सुरू केली असून, स्थानिक उद्योग वाचवण्यासाठी आयात शुल्क वाढवण्याचा विचार सुरू आहे.

भारतीय पोलाद उद्योग सध्या आव्हानांचा सामना करत आहे, अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. भारतीय पोलाद उद्योग सध्या निर्यातीमध्ये झालेली मोठी घट आणि देशात वाढलेली पोलादाची आयात या संकटांचा सामना करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील पोलाद आयात ४१ टक्क्यांनी वाढली आहे, तर निर्यात ३६ टक्क्यांनी घटली आहे.

यादरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच पोलाद मंत्रालयाने पोलाद उद्योगाशी संबंधितांबरोबर सोमवारी एक बैठक घेतली, ज्यामध्ये पोलाद उद्योगाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पोलाद उद्योगासमोरील आव्हाने लक्षात घेत मंत्रालयाने काही ठराविक पोलादी वस्तूंवर २५ टक्के सेफगार्ड ड्युटी लावण्याचा प्रस्ताव सादर केला.

 

अधिक बातम्या वाचा =>